वहीदान उपक्रमासाठी शंभर डझन वह्यांचे संकलन

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील सातारा मित्र मंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावातील विद्यार्थ्यांसाठी वही संकलनाचा उपक्रम सुरू आहे. यामध्ये तुकाराम तनपुरे फाऊंडेशनच्या वतीने मंडळास शंभर डझन वह्या देण्यात आल्या.
चिंचवड येथील मंदार देव महाराज यांच्या हस्ते तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचलित पोलिस नागरिक मित्र संघटना यांच्याकडुन संकलित झालेल्या वह्या सातारा मित्र मंडळाकडे जमा करण्यात आल्या. सातारा मित्र मंडळाच्या वतीने सातारा परिसरातील दुष्काळी भागातील शेतकरी कष्टकरी मुलांसाठी एक डझन वही व पेन हा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरातुन राबवला जात आहे. या उपक्रमातुन संकलित झालेल्या वह्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमात अनिता धोका, कविता कोथिबीरे, श्री.सोमनाथ कोरे, संजय चव्हाण, संभाजी मोरे, सतीश जाधव, शिवाजी माने आदी परिश्रम घेत आहेत.