breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लोणावळ्यात पत्नी आणि मुलीची हत्या करुन एकाची आत्महत्या

पिंपरी : पत्नी आणि मुलीची दोरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या करुन एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज (रविवारी) लोणावळ्याजवळील भांगरवाडी हनुमान टेकडी लगत असलेल्या क्रांतीनगर वसाहतीमध्ये घडली.

बबन जयवंत धिंदळे (वय 38) यांने स्वत:च्या राहत्या घरात पहाटेच्या सुमारास पत्नी दीपाली धिंदळे (वय 30) आणि मुलगी दिप्तीधिंदळे  (वय 11) यांचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर बबन याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

बबन याने मुलगा रोहित धिंदळे  (वय 9) याचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने त्यामध्ये तो वाचला असून त्याच्यावर लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button