पुणे

लोणावळ्यातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार: श्रीरंग बारणे

लोणावळा: लोणावळा शहरातील जीवघेणी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी केंद्रात तसेच राज्यात पाठपुरावा करण्याचे आश्वासन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. खासदार आपल्या दारी या उपक्रमाद्वारे बारणे यांनी लोणावळ्यातील समस्या, नगरपरिषदेच्या समस्या जाणून घेतल्या.
लोणावळ्यातील वाहतुक समस्या सोडविण्यासाठी महत्वाचा ठरणारा रिंगरोड सर्व्हे नं. 30 येथिल संरक्षण विभागाच्या जागेमुळे रखडला आहे. तसेच भांगरवाडी येथिल रखडलेला नियोजित रेल्वे उड्डाण पूल, रेल्वे गेट नं. 30 व 32 येथिल उड्डाण पूल या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्याचे आश्वासन बारणे यांनी दिले तसेच लोणावळा शहराच्या पर्यटन विकासात वाढ करण्यासाठी रेल्वेचे संग्रहालय लोणावळ्यात सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी, मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर, नगरसेवक नितिन आगरवाल, सुनील इंगूळकर, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, डॉ. किरण गायकवाड, आरोही तळेगावकर, अपर्णा बुटाला, जयश्री आहेर, अंजना कडू, रचना सिनकर, सुवर्णा अकोलकर, प्रमोद गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष धमेंद्र शेट्टी, शिवसेना माजी शहरप्रमुख बबनराव अनसुरकर, संगिता कंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार बारणे यांच्या हस्ते दहावीत लोणावळा शहरात प्रथम आलेल्या शरवरी मेढे हिचा सत्कार करण्यात आला. तसेच भोंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तेजोरमयी बंडी व आरती गावडे यांनी कॅलिफोर्निया स्थित कॉम्पेटेटिव्ह एक्सचेंज या विभागीय स्तरावरील स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button