breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लोका संगे ब्रम्हज्ञान…!

पार्किंग झोनमध्ये पोलिसांची गाडी ः त्यांना कोण करणार दंड?

पिंपरी – पिंपरीतील कै. किंमतराव आसवाणी भूयारी मार्गाच्या समोरील चैाकात नागरिकांची सतत वर्दळ असते. तसेच खरेदीस आलेल्या नागरिकांच्या वाहनांची देखील ये-जा सुरु असते. त्या वर्दळीच्या ठिकाणी नो पार्किग झोन वाहतूक शाखेकडून करण्यात आलेला आहे. परंतू, त्या नो पार्किग झोनमध्ये पोलिसांनी त्यांची टाटा सुमो वाहन उभे केले होते. त्यामुळे रस्त्याच्या झेब्रा क्रॅासींगवरुन नागरिकांना चालण्यास अडचण येत होती. त्यामुळे लोका संगे ब्रम्हज्ञान.. आपण मात्र कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्यय आला होता. तसेच त्या पोलिसाच्या वाहनांना दंड कोण ? करणार असा सवाल तेथील नागरिक उपस्थित करीत होते.
पिंपरीत खरेदीच्या निमित्ताने रात्री नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहनांना शिस्तीकडे दुर्लक्ष होत असते. अनेक नागरिक रस्त्यावर वाहने लावल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्याच पोलिस देखील चैाकात वाहने लावून बसलेली असतात. पिंपरीत वाहतूक शाखेच्या पोलिसांची टाटा सुमेा गाडी क्रमांक एमएच 12 एएच 7914 ही गाडी नो पार्किंग झोनमध्ये उभी करण्यात आली होती. त्या ठिकाणी एखाद्या सामान्य नागरिकांने गाडी पार्किंग केल्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलीसांनी त्याला कायदा दाखवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत वसुली केली असते. परंतू, अशा प्रकारे पोलीसांनी नो पार्किगमध्ये वाहने उभी करुन इतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होईल, याबाबत थोडाही विचार केलेला नाही. त्यामुळे अशा पोलिसांच्या वाहनावर कारवाई करणार का ? असा सवाल मनसेचे सचिव रुपेश पटेकर यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button