breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकसभा निवडणूक : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रातील 14 खासदारांचे भवितव्य ठरणार

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील औरंगाबाद, रायगड, पुणे, जळगाव, रावेर, माढा, सांगली, जालना, बारामती, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी-सिंधूदुर्ग, हातकणंगले, कोल्हापूर इत्यादींचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये गुजरातमधील सर्व 26 जागा तर केरळ येथील सर्व 20 जागांवर मतदान होणार आहे. यासोबत आसाममध्ये 4 जागा, बिहारमध्ये 5 जागा, छत्तीसगडमध्ये 7 जागा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 14 जागा, ओडिशामध्ये 6 जागा, उत्तर प्रदेशात 10 जागा, पश्चिम बंगालमध्ये 5 जागा, गोव्यात 2 आणि दादर नगर हवेली, दमन दीव आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी 1-1 जागेवर मतदान सुरू आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button