breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकप्रतिनिधींच्या हट्टापाई स्थायीकडून ‘रेडझोन’च्या उद्यानावर लाखोंची उधळपट्टी

यापुर्वी उदयानात अनधिकृत बांधकामे,

विकास कामे करण्याच्या खर्चाला स्थायीची मान्यता

पिंपरी – नद्या, पूररेषा, रेडझोन परिसराचे क्षेत्र निर्धारित केल्यानंतर महापालिकेला तेथील आरक्षित जागेवर विकास कामांसाठी कोणताही निधी खर्च करता येत नाही. पंरतू, महापालिकेच्या स्थायी समितीने यापुर्वी भोसरी- आळंदी रोडवरील मॅंगझीन चाैकातील उद्यानावर कोट्यावधीचा निधी खर्च केलेला आहे. त्यानंतर आता लोकप्रतिनिधींच्या हट्टापाई रेडझोनमधील उद्यान विकसित करण्यासाठी लाखो रुपयांच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी रेडझोन जागेवर कुठलीही कामे करु नयेत, असे आदेश स्थापत्य विभागाला दिले असताना स्थापत्य उद्यान अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून नियमबाह्य कामे करु लागले आहे. याबाबत पारदर्शक कारभार करणारे भाजपचे स्थायी समिती सदस्यही बोलण्यास टाळाटाळ करु लागले आहेत.

भोसरी-आळंदी रोडवरील मॅगझीन चाैकातील उद्यान विकसित करण्यात येत आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 मधील रेडझोन हद्दीतील उद्यान विकसित करण्यासाठी स्थापत्य उद्यान विभागाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. याकरिता सन 2017-18 मधील निविदा रक्कम 36 लाख 86 हजार 314 रुपये असून कामाची मुदत 9 महिन्यांची ठेवली आहे. याकरिता चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. यापैकी मे.डी.जे.एंटरप्रायझेस यांनी निविदा रक्कम 36 लाख 86 हजार 314 रुपये पेक्षा 26.27 टक्के कमी दराने म्हणजे 27 लाख 17 हजार 919 पर्यंत काम करुन देण्यास निविदा भरली आहे. संबंधित ठेकेदाराने तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची निविदा असल्याने ठेकेदार मुदतीमध्ये कामे करुन घेतली जाणार आहे.

दरम्यान,  महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाकडून त्या उद्यानावर यापुर्वी रस्त्याशेजारील सीमाभिंत, उद्यानात अनधिकृत बांधकामावर कोट्यावधीचा खर्च करण्यात आलेला आहे. तसेच रेडझोन हद्दीत काही बांधकामेही बांधलेली आहेत. त्यावर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यानंतर गेल्या कित्येक दिवसापासुन हे उद्यान रेडझोन असल्याने महापालिकेने एकही रुपया खर्च केलेला नाही. परंतू, स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता आयुक्तांचे आदेश डावलून रेडझोनमधील उद्याने विकसित करु लागले आहे. लोकप्रतिनिधींच्या पत्रावरुन त्याठिकाणची उद्याने विकसित केली जावू लागली आहेत. त्या विषयाला स्थायी समितीने कुठलीही चर्चा न करता विषय मंजूर केलेला आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button