पिंपरी / चिंचवड
लेखापरीक्षणातील आक्षेपांबाबत तात्काळ कार्यवाही करा – महापौर

माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरिक्षण व विशेष लेखा परिक्षणातील आक्षेपाधीन रक्कमा वसूल करण्यासंदर्भात माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सोमवार (दि. 10) दिलेल्या पत्राबाबत तात्काळ कारवाई करावी, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना केली आहे.
महापालिकेच्या अंतर्गत लेखापरिक्षण व विशेष लेखा परिक्षणात लेखापरिक्षकांनी काही बाबतीत गंभीर आक्षेप घेतले आहेत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात 2 हजार साली दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत निकाल देताना उच्च न्यायालयाने संबंधितांवर कारवाई करून या रक्कमा संबंधितांकडून वसूल करून त्यांचेवर कारवाई करावी असा निर्णय दिला आहे.
या निर्णयानुसार संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महापौर नितीन काळजे यांना दिले होते. त्या पत्रास अनुसरून काळजे यांनी सोमवारी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्यांचे याविषयाकडे लक्ष वेधत तात्काळ पुढील कार्यवाही करण्यात येऊन त्याचा अहवाल महापौर कार्यालयाकडे पाठवावा अशी सूचना केली आहे.