breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लिफ्टमधून पडल्याने पालिकेचा कर्मचारी जखमी

पिंपरी- महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या लिफ्टमधून पडून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. शरद भोंडवे असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. भोंडवे यांच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपमहापौर कार्यालयात शरद भोंडवे हे कार्यरत आहेत. दररोज प्रमाणे आज सकाळी ते कामावर आल्यानंतर तळमजल्यावरून ४ नंबरच्या लिफ्टने तिस-या मजल्यावर जाण्यास निघाले होते. यावेळी लिफ्टची लाईट अचानक बंद झाली आणि ते लिफ्ट मध्येच अडकले. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा अचानक उघडला गेला. शरद भोंडवे यांनी लिफ्ट मधून बाहेर पाय टाकला, पण लिफ्ट अर्ध्यातच असल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यात त्यांच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णलयात उपचार सुरू असून गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

महापालिकेतील मुख्यालयात एकूण ४ लिफ्ट आहेत. त्यातील एक महापौर,आयुक्त, नगरसेवक, पदाधिकारी तसेच पत्रकार यांच्या वापरासाठी आहे. अन्य तीन लिफ्टचा वापर कर्मचारी तसेच नागरिक करतात. परंतू अनेकदा या लिफ्ट दुरूस्तीच्या कारणास्तव बंद असतात. तसेच, या लिफ्टमध्ये लिफ्टमन जागेवर नसल्याच्या तक्रारीही महापालिकेत येणा-या नागरिकांकडून होत आहे. आज झालेल्या अपघातामुळे या लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित रहात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button