breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लातूरमध्ये ‘निर्भया’ घटनेची पुनरावृत्ती…रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार!

लातूर – दिल्ली येथील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती जिल्ह्यात घडली आहे. 3 नराधमांनी रूग्णालयातून घरी जाणाऱ्या एका महिलेचे रिक्षातून अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर या नराधमांनी महिलेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातला. यामुळे गंभीर झालेल्या महिलेचे हातपाय बांधून झाडीत फेकून नराधमांनी पळ काढल्याची संतापजनक घटना उदगीर येथे उघडकीस आली आहे. महिलेला लातूरच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप पोलिसांनी महिलेचा जवाब घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येरोळ येथील महिला उदगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचार केल्यानंतर ही महिला घरी परत निघाली होती. यावेळी ऍटोतून आलेल्या 3 अज्ञात आरोपींनी या महिलेचे अपहरण केले. तिला ऍटोतून शहराबाहेर आणल्यानंतर या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मात्र त्यानंतर या नराधमांनी अत्यंत किळसवाण्या पद्धतीने महिलेच्या गुप्तांगावर दगडांने मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातला. त्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली. मात्र या नराधमांनी महिलेचे हातपाय बांधून तिला झाडीत फेकून पळ काढला.

वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेचा आवाज ऐकूण या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तीने घटनास्थळी जाऊन पाहिले. तर जखमी अवस्थेतील महिला पाहून त्यांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने महिलेला लातूरच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळ आणि अपहरण करण्यात आलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button