Mahaenews

लाच स्वीकारली नाही म्हणून ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची हत्या

Share On

शिमला : हिमाचल प्रदेशात कसौली येथे बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या सरकारी महिला अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणातील आरोपी विजय ठाकूर याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ती महिला अधिकारी लाच स्वीकारत नव्हती, म्हणून मी तिला ठार केले, अशी कबुली त्याने पोलिसांपुढे दिली आहे.

कसौलीत बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी शैला बाला गेल्या होत्या. त्यावेळी या महिला अधिकाऱ्याचा पाठलाग करत गोळी घालून हत्या करण्यात आली होती आणि मारेकरी हॉटेल व्यवसायिक विजय ठाकूर फरार झाला होता. अखेर पोलिसांनी मथुरा येथून त्याला अटक केली.

Exit mobile version