“लस्ट स्टोरी’मध्ये चार वेगवेगळ्या कथानकांची गुंफण

“लस्ट स्टोरी’ या आगामी सिनेमामध्ये एकाचवेळी चार वेगवेगळ्या कथानकांची गुंफण करण्यात आलेली आहे. या चारही कथानकांचे दिग्दर्शन चार वेगवेगळे दिग्दर्शक करणार आहेत. करण जोहर, अनुराग कश्यप, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी हे या चार कथानकांचे दिग्दर्शन करणार आहेत. तर राधिका आपटे, भूमी पेडणेकर, विकी कौशल, कियारा अडवाणी, मनिषा कोईराला. संजय कपूर आणि नेहा धुपिया ही तगडी स्टार कास्ट त्यामध्ये असणार आहे.
या चारही कथानकांचा पाया वैवाहिक संबंध आणि प्रेम असाच असणार आहे. राधिका आपटे एक कॉलेज विद्यार्थिनी तर भूमी पेडणेकर एका मोलकरणीच्या रोलमध्ये दिसणार आहे. मनिषा कोइराला आणि संजय कपूर हे दाम्पत्य म्हणून दिसणार आहेत. संजय कपूरच्याच मित्राबरोबर मनिषाचे विवाहबाह्य संबंध असल्याचे यामध्ये दिसणार आहे.
पाच वर्षांपूर्वी याच चारही दिग्दर्शकांनी मिळून “बॉम्बे टॉकिज’ चे डायरेक्शन केले होते. या सिनेमाबाबत विश्लेषकांनी जरी खूप चांगले मत दिले होते, तरी बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा अपयशी झाला होता. आता या चारही दिग्दर्शकांच्या या “लस्ट स्टोरी’चा परिणाम तरी चांगला होईल का, हे बघुयात.