breaking-newsराष्ट्रिय

लग्नात समोरच जेवायला बसल्याने दलित तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या

विवाह समारंभात समोरच जेवायला बसल्याचा राग मनात धरून एका दलित तरुणाला बेदम मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तराखंडच्या तेहरी जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. डेहराडून येथे उपचारांदरम्यान सोमवारी या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी ७ आरोपींपैकी ३ जणांना ताब्यात घेतले असून सर्व आरोपींविरोधात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ANI

@ANI

U’khand: 21-yr old Dalit man in Tehri Dist. was beaten by a group of men allegedly for sitting & eating in front of them at a wedding function on Apr26. He died during treatment in Dehradun on May 5. DG Law&Order, says,”3 out of 7 people arrested,case registered under SC/ST Act.”

८८ लोक याविषयी बोलत आहेत

पोलीस उपाधिक्षक उत्तम सिंह जिमवाल यांच्या माहितीनुसार, दलित तरुण जितेंद्र (वय २१) हा कथीत कनिष्ठ जातीचा होता. त्यामुळे त्याने लग्नात आपल्या समोर बसून जेवण करणे कथीत सवर्ण जातीतील काही लोकांना रुचले नाही, त्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी जितेंद्रला बेदम मारहाणी केली. २६ एप्रिल रोजी तेहरी जिल्ह्यातील श्रीकोट गावातील एका विवाह समारंभादरम्यान ही घटना घडली होती.

मारहाणीदरम्यान जितेंद्र गंभीररित्या जखमी झाला होता त्यानंतर नऊ दिवसांनी उपचारांदरम्यान त्याने डेहराडूनमधील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत तरुण जितेंद्रच्या बहिणीच्या तक्रारीवरुन सात जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सात जणांमध्ये गजेंद्र सिंह, सोबन सिंह, कुशल सिंह, गब्बर सिंह, गंभीर सिंह, हरबीर सिंह आणि हुकूम सिंह यांचा समावेश आहे.

याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिमवाल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button