breaking-newsराष्ट्रिय

लग्नाच्या बोलणीसाठी घरी बोलवून मुलीच्या प्रियकराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मुलीच्या कुटुंबाने तिच्या प्रियकराला लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी बोलवल्यानंतर त्याला पेटवून दिल्या धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये समोर आली आहे. मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी केल्यानंतर पोलीस तपासामध्ये हा प्रकार उघडकीस आला. या मुलला मुलीच्या घरच्यांनी घरातीलच एका खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचे पोलिसांना तपासणीदरम्यान अढळले.

इटाह येथील अलीगंज परिसरात राहणारा नरेंद्र शाक्य हा मुलगा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. परिसरातील एका अल्पवयीन मुलगीही नरेंद्रबरोबर बेपत्ता झाली होती. बेपत्ता झालेल्या नरेंद्रला ३० ऑक्टोबर रोजी पेटवून देण्यात आल्याची माहिती तपास करत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या या दोघांना मुलीच्या कुटुबियांनी लग्नाची बोलणी करण्याच्या निमित्ताने घरी बोलवले. मात्र हा मुलगा मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या आमंत्रणावरून तिच्या घरी गेला असता मुलीचे वडील रामनरेश, काका उमेश आणि द्यानंद यांनी दोघांनाही मारहाण केली.  मुलीच्या नातेवाईकांनी तिला पळून नेण्यासंदर्भात नरेंद्रला प्रश्न विचारले. मात्र त्यांना नरेंद्रने दिलेली उत्तर न पटल्याने त्याला खोलीत कोंडले. नंतर त्याच खोलीत त्याच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले. शेजाऱ्यांनी नरेंद्रच्या किंकाळ्या ऐकून पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.

View image on TwitterView image on Twitter

ANI UP

@ANINewsUP

A youth was allegedly set ablaze by his girlfriend’s relatives in Etah’s Aliganj. Sanjay Kumar (SP) says,”Three people locked the victim in a room and set him on fire. We have arrested two accused. He is seriously injured and is undergoing treatment. Case registered.” (31/10)

जखमी अवस्थेतील नरेंद्रला पोलिसांनी अलीगंज कम्युनिटी सेंटरमध्ये दाखल केले. त्यानंतर त्याला सैफाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. नरेंद्रच्या अंगावर बऱ्याच जखमा झाल्या असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. नरेंद्रवर हा जीवघेणा हल्ला करणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. इटाहचे पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या मुलाला एका खोलीमध्ये कोंडून त्याच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला आग लावण्यात आली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button