breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लग्नाच्या तीन दिवस आधी बेपत्ता झाला नवरदेव, हळदी दिवशी विहिरीत सापडला मृतदेह

नगर- कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगावमधील एका नियोजित वराने हळदीदिवशीच विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचे रविवारी (6 मे) लग्न होते. याची तयारी काही दिवसांपासून सुरु होती. पण लग्नाआधीच तीन दिवसांपूर्वी तो घरातून गायब झाला होता. कुटुंबियांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिस शोध घेत असतानाचा त्याचा मृतदेह हळदीच्या दिवशी एका विहिरीत आढळून आल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राम्हणगाव येथील सतीश वेणूनाथ वाकचौरे (वय २६) तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह खिर्डी गणेश शिवारातील एका विहिरीत सापडला असून वाकचौरे कुटुंबीयावर शोककळा पसरली. त्याच्या कुटुंबीयांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तसेच सतीश ज्या गाडीवर बाहेर पडला ती गाडी व त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून त्याचा पोलिस व कुटुंबीय शोध घेत होते.

मात्र, सतीशकडे असलेला मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी निर्माण होत होत्या. हळदीच्या दिवशी दुःखद घटना समोर आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. काल खिर्डी गणेश शिवारातील एका शेतातील विहिरीजवळ सतीशची दुचाकी काही जणांना दिसून आली. त्यांनी व्हॉटसअ‍ॅपवरील गाडी नंबर तपासाला असता तो सतीशच्या गाडीचा निघाला. तसेच शेजारील विहिरीत सतीशचे प्रेत तरंगत असताना आढळून आल्याने त्यांनी मयत सतीशच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button