%page_title%Mahaenews | Marathi News | News in marathi| Marathi latest news ...
BREAKING NEWS
ad
ad

रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे, बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश

मुंबई – राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ५२ वर कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. त्याचवेळी पाच रुग्ण बरेही झालेत. मात्र,  कोरोनाचा फैलाव झालेल्या महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरांत जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सोडून अन्य सर्व दुकानं आणि ऑफिसेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. असे असले तरी रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे, बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी जनतेला संदेश देताना हा निर्णय जाहीर केला. महामुंबईमध्ये मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही शहरंही बंद राहणार आहेत. महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर बंद ठेवण्याची अंमलबजावणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. 

राज्यातल्या रेशन दुकानांना तीन महिन्यांचे पुरेल इतके धान्य, कांदे, बटाटे देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्याकडे पुरेसा निधी असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Copyright © 2021. All Rights Reserved Mahaenews.com. Designed by www.amralinfotech.com.

%d bloggers like this: