breaking-newsताज्या घडामोडीपुणे

रेल्वे रुळ आेलांडताना निष्काळजीपणा बेततोय जिवावर

पिंपरी : पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड ते खडकी दरम्यान अपघातांचे प्रमाण अधिक आहे. पुणे, तसेच लोणावळा या अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या हद्दीत घडणाऱ्या अपघाताच्या घटनांच्या तुलनेत देहूरोड ते खडकी या वर्दळ नसलेल्या ठिकाणी अपघातांची अधिक नोंद आहे. या अपघातांना नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.

पुणे ते लोणावळा लोहमार्गावर देहूरोड ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान महिन्याकाठी किमान दोन ते तीन जण रेल्वे अपघाताचे बळी ठरत आहेत. वास्तविक, या मार्गावर लोकलच्या फेºया कमी आहेत. एक्सप्रेससुद्धा विशिष्ट वेळेत आहेत. मुंबई, पुण्याप्रमाणे येथे रेल्वे मिनिटा-मिनिटाला धावत नाही. तरी वर्षभरात घडलेल्या घटनांची संख्या २५ हून अधिक आहे. देहूरोडमध्ये ३, आकुर्डीत ४, पिंपरीत ६, कासारवाडीत ५, दापोडीत ४, खडकीत ३ अशा अपघातांच्या घटनांची नोंद आहे. याशिवाय रेल्वे अपघातात जखमी होण्याच्या, कायमचे जायबंदी होण्याच्याही घटना शहरात घडल्या आहेत.
कानाला हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणाºया तरुणांना रेल्वेच्या धडकेने जीव गमावावा लागल्याच्या घटना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा महिन्यांपूर्वी घडल्या आहेत. धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणाºयांना पिंपरी आणि कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या हद्दीत प्राणास मुकावे लागले आहे. रेल्वे प्रवासात हुल्लडबाजी करणाºया दरवाजात थांबून अथवा दरवाजात पाय बाहेर सोडून बसणारे तरुण खांबाचा धक्का लागून पडले आहेत. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांची रेल्वे पोलिसांकडे नोंद आहे. देहूरोड, पिंपरी, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी या रेल्वे स्थानकांवर हमखास अपघात घडून येत आहेत.
रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडताना कोयना एक्सप्रेसच्या धडकेत दोन मुलांसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. १२ नोव्हेंबर २०१७ ला पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडलेली घटना अद्यापही नागरिकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. लोणावळा-पुणे लोकलमधून पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर मुलांना घेऊन रुळ ओलांडत असताना मुंबईकडे जाणाºया कोयना एक्सप्रेसची धडक महिलेसह मुलांना बसली. तिघांचा जागीच मृत्यू झाला. २५ वर्षे वयाची महिला, सात वर्षांचा मुलगा, १० वर्षांची मुलगी आहे. असे तीनजण रेल्वे अपघातात दगावले. या घटनेनंतर नागरिक दक्षतेचा धडा घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र मातेसह दोन मुले दगावण्याची हृदयद्रावक घटना घडल्यानंतरही जोखीम पत्करून धोकादायकरीत्या रूळ ओलांडणाºयांची संख्या घटलेली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले पादचारी पूल ओस पडल्याचे दिसून येतात. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी येथे पुलाचा वापर करण्याऐवजी उडी मारून शॉर्टकट मार्गाने रुळ ओलांडताना प्रवासी दिसून येतात. रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे रुळ ओलांडू नये,पादचारी मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना दिल्या जात असताना, त्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी धोकादायकरीत्या रुळ ओलांडताना दिसतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button