breaking-newsराष्ट्रिय

रेल्वेत आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या चहा कॉफी विक्रेत्यावर कारवाई

नवी दिल्ली – रेल्वेगाडीत चहा, कॉफी विकणारा एक विक्रेता प्रसाधनगृहातून बाहेर येत असल्याचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रसारित होतो आहे. या व्हिडिओसोबत आलेल्या संदेशात हा विक्रेता चहा, कॉफीच्या कॅन्समध्ये प्रसाधनगृहातील पाणी वापरत असल्याचेही म्हटले आहे. या व्हिडिओची गंभीर दखल घेत रेल्वे विभागाने योग्य ती कारवाई केली आहे.

या प्रकरणी तपास केल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये चेन्नई-हैदराबाद-चारमिनार एक्‍सप्रेस क्र. 12759 मध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले. याप्रकरणी सखोल तपास करण्यात आला असून या विक्रेत्याला कामावर ठेवलेले कंत्राटदार पी. शिवप्रसाद यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच आयआरसीटीसीने याप्रकरणी शिवप्रसाद यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली असून 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणारे इतर दोन इसम अनधिकृत फेरीवाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पश्‍चिम मध्य रेल्वेच्या व्यावसायिक विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तपास मोहीम हाती घेतली असून या दोघांसह इतर अनेक अनधिकृत फेरीवाल्यांना विक्रीस आणि प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कठोर निरीक्षण सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button