breaking-newsआंतरराष्टीय

रेल्वेच्या शौचालयातील पाण्याने चहा बनवण्याचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : एकीकडे सरकार बुलेट ट्रेनची तयारी करत असताना दुसरीकडे रेल्वेचा घाणेरडा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेनमधील एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ट्रेनमधील कर्मचारी तेथील शौचालयामधील पाण्याने चहा बनवत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सुरुवातीला हा व्हिडीओ खरा आहे की, नाही याबाबत बरीच चर्चा सुरु होती. पण आता रेल्वेकडूनच याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा असल्याचे समोर आले आहे. रेल्वे याप्रकरणी वेंडरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा व्हिडीओ मागील वर्षी डिसेंबरमधील आहे. असे स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आले आहे. ही घटना चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमिनार एक्सप्रेसमधील असल्याचे समोर आले आहे. ‘याप्रकरणी वेंडिंग कंत्राटदार पी शिवप्रसाद याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.’ अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी एम उमाशंकर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button