रेल्वेच्या रिकाम्या जागा व रुळाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करु : सुरेश प्रभू

मावळ : भारताचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन भारत सरकारच्या 2017-18 मध्ये 13 कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाच्या प्रचाराचा रविवारी शुभारंभ केला. यावेळी बोलताना सुरेश म्हणाले की, रल्वे मंत्रालयाचा वनविभागाशी झालेल्या करारानुसार रेल्वेच्या मोकळ्या जागा व रुळाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याला प्राधान्य देणार आहे.
यावेळी आमदार मंगल लोढा, तहसीलदार रंजीत देसाई , वनविभागाचे अधिकारी विवेक खांडेकर, रंगनाथ नाईकडे, सोमनाथ ताकवले, पीएमआरडीएचे अधिकारी, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, रौनक खरे, सूरज शिदे, शुभम काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभू म्हणाले की, रल्वे मंत्रालयातर्फे वनविभागासी जो वृक्षलागवडीचा करार झाला आहे. त्यानुसार रल्वेच्या मोकळ्या व वापरात नसलेल्या जागा तसेच रल्वे रुळाच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी आमचे प्राधान्य आहे. यामध्ये ज्या अडचणी येत आहेत. त्याही चर्चा करुन सोडविण्यात येतील. तसेच 13 कोटी झाडे लावण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा व पर्यावरण संरक्षणात हातभार लावावा असेही ते म्हणाले.
यावेळी 13 कोटींपैकी 5 लाख वृक्ष लागवडीची जबाबदारी पीएमईरडीयएतर्फे घेण्यात आली आहे. तर यासंदर्भात राज्यभरातील सर्वच वनविभाग अधिका-यांची 22 जुलै रोजी राज्याचे अर्थमंत्री व वनविभागमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे बैठक होणार आहे. यामध्यो कोणी किती, कोठे व कशी झाडे लावायची याचे नियोजन करण्यात येणार आहे.
2017-18 वर्षात होणा-या 13 कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमात स्थानिक स्वरुपाची व पर्यावरणपूरक झाडे लावण्यात येणार आहेत., यामध्ये शासकीय संस्था, खासगी संस्था, रल्वे व वनविभाग मंत्रालय यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती वनअधिकारी नाईकडे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिली.