breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुग्णालयातच गळफास घेत रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी –  चिंचवडच्या लोकमान्य रुग्णालयात रुग्णाने टॉवेलच्या साहाय्याने शॉवरला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.

शाम तिकोने (वय ५५ ) असे रुग्णाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाथरूममध्ये गेलेला रुग्ण बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दार ठोठावले. आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने, दरवाजा तोडला असता शॉवरला टॉवेलच्या साह्याने तो गळफास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने खाली उतरवले.  त्याच्यावर उपचार सुरू केले. हाय ब्लड प्रेशर करिता उपचार घेण्यासाठी ते ३१मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना मंगळवारी दुपारी घरी सोडले जाणार होते. तत्पूर्वी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button