breaking-newsताज्या घडामोडीपुणे
रुग्णांचे हाल थांबवा, कायदेशीर मार्गाने वाद सोडवण्याचे आवाहन

– प्रहार जनशक्ति पार्टीच्या पुढाकाराने वाद शमले
पुणे – पुण्यातील सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या जागेवर चालणा-या हेल्थकेअर मेडीकल फाउंडेशन संचलित अतिदक्षता विभाग बंद करण्यात येणार होते. तसेच वीज, पाणी पुरवठा देखील बंद करण्याची नोटीस दिली. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना अन्यत्र हलवावे लागणार होते.याबाबत प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने संबंधित ट्रस्टींना भेटून सदरील जागेबाबत वाद हा कायदेशीर मार्गाने सोडवावा, तसेच आपल्या वादात रुग्णाचे हाल करु नये, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर हे वाद शमल्याने आता रुग्णांचे हाल थांबणार आहे.
प्रहार जनशक्तीच्या पार्टीकडून दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुण्यातील सेठ ताराचंद रामनाथ चेरिटेबल ट्रस्टच्या आवारात हेल्थकेअर मेडिकल फाउंडेशन संचलित अतिदक्षता विभाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्या अंतर्गत वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे वस्तीगृहात राहणाऱ्या अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांना चोवीस तासात सोडून देण्याचे फर्मान काढले होते. याबाबत प्रहार जनशक्ति पार्टीच्या वतीने गौरव जाधव, नयन पुजारी आणि नाैशाद शेख यांनी कायदेशीर बाबीचा पाठपुरावा करत या वादाला पूर्णविराम दिला.
याकरिता दोन्ही ट्रस्टीच्या विश्ववस्ताची भेट घेवून हा वाद कायद्याने सोडवण्याची विनंती केली. ट्रस्टीच्या वादात रुग्णाचे हाल होवू नये, याबाबत विनंती करण्यात आली. सेठ ताराचंदचे विश्वस्त गोपाळ राठी यांनी ही कारवाही थांबवत कायदेशीर रित्या सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे प्रहार जनशक्ति पार्टी दोन्ही ट्रस्टच्या विश्वस्थाचे आभार मानले.