breaking-newsपिंपरी / चिंचवड
रिक्षा परमिट खुले झाल्याने युवकांना रोजगार : आमदार गौतम चाबुकस्वार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – खराळवाडी येथे गणेश टी. व्ही. एस. कंपनीच्या वतीने अंजली ऑटो या नावे नवीन शाखेचे उद्घाटन पिंपरी विधानसभेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नितिन घोलप, मारुती पेंद्री, आशा कांबळे, राजू दीक्षित , ईसाक राज, जाफर कुरेशी, विनोद वरखडे, शोरुमचे मालक सुदाम बनसोडे, महादेव थोरात आदी उपस्थित होते. यावेळी गौतम चाबुकस्वर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षाचे परवाने खुले केले. यामुळे तरुण युवकांना रोजगाराची संधी मिळाली आहे पिंपरी येथे मध्यवर्ती शोरूम झाल्यामुळे रिक्षा चालकांना रिक्षा खरेदीची सोय झाली आहे, यावेळी आमदार गौतम चाबुकस्वर यांच्या हस्ते वकील शेख या रिक्षा चालकास पहिलं रिक्षाची चावी देण्यात आली.