रिक्षाचालकांनी मुलांना उच्च शिक्षण दयावे; बाबा कांबळे यांचे आवाहन

- पनवेल येथे रिक्षा चालक-मालकांचा मेळावा संपन्न
पिंपरी – आपला मुलगा रिक्षा चालक व्हावा, हे कोणत्याच रिक्षाचालकांना वाटत नाही. यासाठी रिक्षाचालक उपासमारी सहन करून आपल्या मुलांना शिकवत असतो. रिक्षाचालकांनी मुलांना उच्च शिक्षण द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी केले आहे.
पनवेल येथे झालेल्या रिक्षा चालक मालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अखिल भारतीय मोटार ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. 5) येथील गोखले सभागृहात रिक्षा चालकांच्या १२ वी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार आणि रिक्षा चालक-मालकांचा मेळावा घेण्यात आला. अखिल भारतीय मोटार ट्रेनपोर्ट संघटनेचे अध्यक्ष मधुकर थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे, भारतीय मजदूर ट्रान्सपोर्ट विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र सोनो, शिवाजी गोरे (कल्याण डोंबवली ) मारुती कोंडे (नवी मुंबई ), इकबाल शेख (पिंपरी) आदी उपस्थिती होते. यावेळी १२ वी उत्तीर्ण झालेल्या रिक्षाचालकांच्या मुला-मुलींचा बाबा कांबळे, राजेंद्र सोनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाबा कांबळे म्हणाले की, वकील आणि डॉक्टर यांना वाटते आपला मुलगा आपल्यासारखा व्हावा. परंतु, रिक्षाचालकांना मात्र आपला मुलगा रिक्षाचालक व्हावा, असे कदापी वाटत नाही. यामुळे ते मुलांना शिक्षण देत आहेत. रिक्षाचालकांची मुले डॉक्टर, वकील आणि आयएएस अधिकारी झाले आहेत. रिक्षा चालकांनी मुलांना शिक्षण द्यावे आणि अधिकारी बनवावे.
राजेंद्र सोनी, मधुकर थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत मोरे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक नथु पाटील यांनी केले. तर, आभार अशोक शांताराम पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परेश गोंधळी, अमर माने, दत्ता सुबे, मोहमद तुपके, सदैल राखे, सुभाष पाटील, अविनाश भुर्गुने, श्रीधर अष्टेकर, सोपान नाईक, मारुती मस्कर यांनी परिश्रम घेतले.