breaking-newsमनोरंजन

रिंकू म्हणते, मला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याबरोबर डेटवर जायला आवडेल

‘सैराट’ या चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. ‘सैराट’ चित्रपटाच्या यशानंतर रिंकू लवकरच ‘कागर’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये रिंकूने राणी ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सध्या रिंकू या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून प्रमोशन करत असताना तिने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या विकी कौशलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे तरुणींमध्ये विकीची सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळते. या साऱ्यामध्ये रिंकूदेखील त्याची चाहती असून तिला त्याच्यासोबत डेटवर जायची इच्छा असल्याचं तिने एकदम कडकच्या मंचावर म्हटलं.

कलर्स मराठीवरील ‘एकदम कडक’ या कार्यक्रमावेळी रिंकू राजगुरू, आकाश ठोसर आणि चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. यावेळी रिंकूला काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांमध्ये ‘कोणत्या अभिनेत्यासोबत डेटवर जायला आवडेल, रितेश देशमुख की विकी कौशल ?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी रिंकूने जराही विलंब न करता विकीचं नाव घेतलं. त्यामुळे रिंकू विकीची मोठी चाहती असल्याचं स्पष्ट झालं. रिंकूप्रमाणेच आकाश आणि नागराज यांनाही असेच काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी या प्रश्नांची कोणती उत्तरं दिली हे सारं ‘एकदम कडक’च्या येत्या आठवड्यातील भागात उलगडणार आहे.

दरम्यान, ‘एकदम कडक’ कार्यक्रमामध्ये रिंकू आणि शुभंकर यांनी कागर या चित्रपटातील लागलीया गोडी तुझी या गाण्यावर सुंदर डान्स सादर केला आहे. कागर या चित्रपटातील संपूर्ण टीमने त्यांचा चित्रीकरणा दरम्यानचा अनुभव, किस्से, त्यांच्या भुमिकेबद्दल आणि कथेबद्दल सांगितले. रिंकूने सांगितलम, “कागरसारखा सिनेमा येण्याची मी वाट बघत होते कारण यातली माझी भूमिका वेगळी आहे आणि चित्रपटाचा विषय देखील वेगळा आहे”. याच बरोबर कागर चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी कागर चित्रपटाच्या कथेबद्दल सांगितले. तेव्हा नक्की बघा “एकदम कडक” कार्यक्रमाचे येत्या आठवड्याचे भाग सोम ते बुध रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button