breaking-newsराष्ट्रिय
राहुल यांच्या कृतीचे समाजवादी पक्षाकडून समर्थन

लखीमपुर खेरी – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सदभावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत मिठी मारण्याचे जे कृत्य केले त्याचे समाजवादी पक्षाने समर्थन केले आहे. पण या कृतीची स्वत: मोदींनी ज्या प्रकारे थट्टा केली ते त्यांच्या पदाला शोभणारे नव्हते असे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रविप्रकाश वर्मा यांनी म्हटले आहे.
येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या बद्दल जो आदर दाखवला तो कौतुकास्पद होता. पण त्यावर मोदींनी दिलेली प्रतिक्रीया दुर्देवी होती. या विषयावर मोदींनी सहारणपुर येथील सभेत उडवलेली खिल्लीही त्यांच्या पदाला शोभणारी नव्हती. उत्तरप्रदेशातील संभाव्य राजकीय आघाडीबाबत मात्र कोणतेही भाष्य करणे त्यांनी यावेळी टाळले.