breaking-newsराष्ट्रिय
राहुल गांधी हे अपयशी घराणेशाहीचे प्रतिक

नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी मोदींचे रिपोर्ट कार्ड काढून त्यांची खिल्ली उडवली असली तरी भाजपनेही त्यांना तातडीने प्रत्युत्तर देताना राहुल गांधी हे अपयशी घराणेशाहीचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. कार्यक्षम सरकारच्या कार्याचे मुल्यमापन करताना तुम्ही किती वेळा अपयशी झालात हे लक्षात घ्या असे त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटले आहे.
राहुल गांधी हे सन 2013 साली कॉंग्रेसचे उपाध्यक्ष झाले तेव्हापासून कॉंग्रेस देशात किती वेळा निवडणूक हरली आहे याचा एक व्हिडीओही भाजपने ट्विटर संदेशाद्वारे प्रकाशित केला आहे. राहुल गांधी उपाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेस 24 निवडणुका पराभूत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.