breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकता दाैड’चे आयोजन

पिंपरी ( महा ई न्यूज )- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिन हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या दिनाचे आैचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी (दि.31) एकता दाैडचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक नगरसेवक शितल शिंदे यांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 आॅक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार दरवर्षी दिल्ली रन फाॅर युनिटी या मॅरेथानची सुरुवात केली. त्यानूसार पिंपरी चिंचवड शहरातही एकता दाैडचे आयोजन केले असून स्पाईन रोड, चिंतामणी चाैक, वाल्हेकरवाडी ते भेळ चाैक प्राधिकरण अशा प्रकारे एकता दाैड करण्यात आली आहे. या दाैडला भाजप शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप हे झेंडा दाखवून सुरुवात करणार आहेत. या कार्यक्रमास महापाैर राहूल जाधव, उपमहापाैर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक सहभागी होणार आहेत.

या एकता दाैडमध्ये शहरातील विद्यार्थी, युवक-युवती, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button