पिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी नगरसेवकांचे महापालिकेसमोर कचरा फेको आंदोलन

पिंपरी– रावेत आणि किवळे परिसरातील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला जात नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा फेको आंदोलन केले. नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल. तसेच अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा  इशारा त्यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वार्ड क्रमांक १६ मधील किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर आणि वाल्हेकरवाडी या परिसरातील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला गेला नाही. प्रभागातील कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या नादुरुस्त आहेत. जागोजागी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मात्र, महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेकदा निवेदन देऊनही आयुक्तांनी दखल घेतली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाला या गंभीर प्रश्नांची जाणीव व्हावी, यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेकून आंदोलन करण्यात आले. यापुढे प्रशासनाने लक्ष न दिल्यास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकू, असा इशारा माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button