breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादीच्या मोर्चाचा भाजपने घेतला धसका

पिंपरी- राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज आणि उद्या हल्लाबोल मोर्चाचे काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त पिंपळे सौदागर जगताप डेअरी चौक येथे लावण्यात आलेला अधिकृत फलक प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई सुरू असल्याचे समजताच राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकृत फलक असताना कारवाई का करता असा सवाल त्यांनी अधिका-यांना विचारला. त्यावेळी अधिका-यांनी सारवासारवीची उत्तरे देत तो फलक पुन्हा लावल्याने या वादावर पडदा पडला. त्यानंतर मात्र सत्ताधारी भाजपच्या सुडबुध्दीच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत फ्लेक्स उभारू नयेत ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र, अधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणे चुकीचे आहे. एकीकडे शहरात सर्रासपणे अनधिकृत फलक लावले जात असताना केवळ सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या फलकावर कारवाई केली जात आहे. राष्ट्रवादीचा शहरात दोन दिवस हल्लाबोल मोर्चा आहे. त्याची धास्ती सत्ताधारी भाजपने घेतली आहे. आज जगताप डेअरी चौकात हल्लाबोलच्या अधिकृत फलकावर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. मात्र, नेते नाना काटे यांनी जाब विचारला तेव्हा त्यांना त्याचे कारणही योग्य पध्दतीने देता आले नाही. सत्ताधा-यांच्या दबावामुळेच ही कारवाई होणार होती. अखेरीस हतबल होऊन अधिका-यांनी तो फलक पुन्हा लावला.

याबाबत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले की, दोन दिवस राष्ट्रवादीचा मोर्चा आहे. राज्यभरात हल्लाबोल मोर्चाद्वारे भाजपच्या निष्क्रियतेचे पितळ उघडे पडू लागले आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी याचा धसका घेतला आहे. त्यामुळे सुडबुध्दीने अधिकृत फ्लेक्सवर अधिका-यांना सांगून कारवाई केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button