breaking-newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडी

राष्ट्रकुलमध्ये भारताला धक्का; दोघांवर निलंबनाची कारवाई

गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांनी सुवर्णपदकांचा धडाका कायम ठेवत पदक तालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. पण भारतीयांच्या या आनंदावर मात्र एका घटनेने विर्जन पडले आहे. भारताच्या दोन खेळाडूंना नो नीडल पॉलीसीचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. ट्रिपल जम्पपर राकेश बाबू आणि रेस वॉकर केटी इरफान अशी त्या खेळाडूंची नावे आहेत.

गोल्ड कोस्टमध्ये खेळाडूंच्या राहण्याच्या खोलीमध्ये एका कपात सिरिंज मिळाली होती. त्यांनतर झालेल्या चौकशीत नो नीडल पॉलिसीचे उलंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली. संबंधित खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष लुईस मार्टीन यांनी म्हटले आहे की, राकेश बाबू आणि केटी इरफान यांच्या खोलीत सुई सापडल्यानंतर याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. खेळाडूंच्या चौकशीनंतर खोलीत तपासणी करताना त्यांच्या बॅगमध्ये सुई सापडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. खेळाडूंसोबत व्यवस्थापक विक्रमसिंह सिसोदिया, नामदेव शिरगांवकर आणि रवींद्र चौधरी यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. कारण त्यांनी नो नीडल पॉलिसीचे नियम पाळण्यात हलगर्जीपणा केल्याचे मार्टीन यांनी सांगितले.

रेस वॉकमध्ये केटी इरफान २० किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने या रेसमध्ये १३ वे स्थान पटकावले होते. तर राकेश बाबू उद्याच्या ट्रिपल जम्पमध्ये उतरणार होता. पण आता फेडरेशनने त्याच्यावर बंदी घातली आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनच्या कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी पत्रकाद्वारे याची माहिती दिली. फेडरेशनकडून भारताच्या राष्ट्रकुल संघातील निलंबित खेळाडूंना तातडीने मायदेशी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यावर भारतीय संघ व्यवस्थापानाकढून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

याअगोदर स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय बॉक्सिगचा संघ वादात अडकला होता. तेव्हा खेळाडूंची डोपिंग चाचणी झाली. त्यात ते निर्दोष सुटले होते.

नो नीडल पॉलिसी

कोणत्याही जखमेवर अथवा आजारी असेल तरच इंजेक्शन, सुईचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी विशेष परवानगीची गरज असते. खेळाडूंशिवाय त्यांच्यासोबत राहणाऱ्यांनाही कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन सोबत घेण्याची परवानगी नसते. कोणत्याही खेळाडूने इंजेक्शन घेतले असल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. जर तसे केले नाही तर पॉलिसीचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले जाते. त्यानंतर डोपिंगसह इतर चाचण्या घेतल्या जातात.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button