breaking-newsताज्या घडामोडीपुणे

”राम नाम सत्य है, मोदी सरकार भ्रष्ट है”,

 ‘ पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने काढली ‘अंत्ययात्रा’

पिंपरी- वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथून दुचाकीची अंत्ययात्रा काढली. यावेळी ”राम नाम सत्य है, मोदी सरकार भ्रष्ट है”, ”पेट्रोल दरवाढ करणा-या भाजप सरकारच्या निषेध असो” अशा घोषणा देवून सरकारचा निषेध करण्यात आला.

चिंचवडच्या लिंकरोड येथील कालिका माता मंदिरापासून दुचाकीच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. गावडे पेट्रोल पंप, चापेकर चौक मार्गे मोरया गोसावी मंदिरापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. या आंदोलनात  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर अपर्णा डोके, प्रवक्ते फजल शेख, विद्यार्थी शहाराध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक निलेश पांढारकर, निलेश डोके, राजेंद्र साळुंखे, विजय गावडे, युवक संघटक विशाल काळभोर, लाला चिंचवडे, हर्षवर्धन भोईर, नितीन नाणेकर, अलोक गायकवाड, साकी गायकवाड आदी सहभागी झाले होते.

विशाल वाकडकर म्हणाले, ”कच्च्या तेलाचा भाव कमी आहेत. तरीदेखील पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. पेट्रोल 83 रुपये लिटर झाले आहे. भाजपच्या राजवटीत जनतेला सर्वाधिक महाग पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगने मुश्किल झाले आहे. विरोधी पक्षात असताना पेट्रोलचे दर 70 रुपयांवर गेल्यावर भाजपच्या नेत्यांनी मोठी आंदोलने केली होती. आता पेट्रोल 83 रुपये पार झाले तरी भाजपचे लोक शांत आहे. भाजपने निवडणुकीत केवळ अच्छे दिनाचे आभासी स्वप्न दाखविले होते. परंतु, एकही आश्वासन भाजपने पूर्ण केले नाही. घरगुती गॅसच्या किमतीदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये देखील भरमसाठ वाढ झाली आहे. या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे  केंद्र व राज्य सरकारच्या स्वप्नवत अच्छे दिनाची ‘अंत्ययात्रा’ काढण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button