breaking-newsराष्ट्रिय

राम जन्मभूमीवर रामाचं नाही तर कोणाचं मंदिर बांधणार ? – रामदेव बाबा

अयोध्येत राम मंदिर बांधकाम सुरु करण्याच्या चर्चा सुरु झाल्या असून अनेकजण यावर उघडपणे भाष्य करत आपलं मत मांडताना दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी अयोध्येबद्दल दिवाळीत चांगली बातमी ऐकायला मिळेल असं सूचक वक्तव्य केल्यानंतर आता योगगुरु रामदेव बाबा यांनीही राम जन्मभूमीवर रामाचं नाही तर कोणाचं मंदिर बांधणार ? असा सवाल विचारला आहे.

रामदेव बाबा यांनी न्यायालयाने निर्णय देण्यास उशीर केला तर संसदेत विधेयक आलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. ‘न्यायालयाने निर्णय देण्यास उशीर केला तर संसदेत विधेयक आलं पाहिजे, आलंच पाहिजे. राम जन्मभूमीवर रामाचं नाही तर कोणाचं मंदिर बांधणार ? संत आणि राम भक्तांनी राम मंदिराला उशीर होता कामा नये असा संकल्प केला आहे. मला वाटतं वर्षाच्या सुरुवातीलाच शुभ वार्ता मिळेल’, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

ANI

@ANI

Yadi nyaylay ke nirnay mein der hui to sansad mein zarur iska bill aega,aana hi chahiye.Ram Janmabhoomi pe Ram mandir nahi banega to kiska banega?Santon/Ram bhakton ne sankalp kiya ab Ram mandir mein aur der nahi,mujhe lagta hai isi varsh shubh samachar desh ko milega:Baba Ramdev

दरम्यान याआधी राम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष राम विलास वेदांती यांनी डिसेंबर महिन्यात राम मंदिराचं बांधकाम सुरु होईल असं म्हटलं होतं. ‘डिसेंबर महिन्यात राम मंदिराचं बांधकाम सुरु होईल. कोणत्याही विधेयकाशिवाय आणि परस्पर संमतीने अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरु होईल आणि मस्जिद लखनऊत उभारली जाईल’, असं राम विलास वेदांती यांनी म्हटलं आहे.

ANI UP

@ANINewsUP

Construction of Ram Temple will begin in December. Without an ordinance and on the basis of mutual agreement, Ram temple will be constructed in Ayodhya and a masjid will be constructed in Lucknow: Ram Vilas Vedanti, President of Ram Janambhoomi Nyas

‘योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असण्यासोबतच एक मोठे संत आहेत. नक्कीच त्यांनी अयोध्येसाठी धोरण आखलं असणार. दिवाळी येऊ द्या….आनंदाची बातमी मिळण्याची वाट पहा. मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच ही योजना समोर आली तर योग्य होईल’, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी म्हटलं आहे.

याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत आपण एका चांगली बातमी घेऊन जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर लगेचच महेंद्रनाथ पांडे यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. अयोध्येची सुनावणी जानेवारी महिन्यात होण्यासंबंधी विचारलं असता योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा अन्यायामुळे न्याय मिळण्यास उशीर होतो अशी प्रतिक्रिया दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button