breaking-newsराष्ट्रिय
‘रामाने केलं होतं सीतेचं अपहरण’, संस्कृतच्या पुस्तकात अजब धडा

अहमदाबाद : रावणाने नाही, तर रामाने सीतेचं अपहरण केल्याचा अजब धडा पुस्तकात छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमध्ये इयत्ता 12वीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात हा धडा वाचायला मिळाला आहे. ‘इंट्रेडक्शन टू संस्कृत लिटरेचर’ या पुस्तकातील 106 क्रमांकांच्या पानावर ही चूक आहे. राम चरित्राचं वर्णन करताना सीतेच्या अपहरणाबद्दल लिहिण्यात आलं आहे. पण तेथे रावणाच्या जागी राम हा शब्द लिहिण्यात आला आहे. म्हणजेच रामाने सीतेचं अपहरण केलं होतं असं या लेखात म्हटलं आहे.
इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात ही चूक आहे. गुजराती माध्यमाच्या पुस्तकात ही चूक नाही. ‘सीतेचं अपहरण रामने नाही, तर रावणाने केलं होतं हे सर्वांना माहिती आहे. ‘रघुवंशम’मध्येही तसाच उल्लेख आहे, असं माजी संस्कृत प्रोफेसर वसंत भट्ट यांनी सांगितलं.