breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

रामदेव यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल!

नवी दिल्ली: सोशल मीडियावर आज दुपारी योगगुरू बाबा रामदेव यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल झाली आणि एकच हलकल्लोळ माजला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर झालेल्या कार अपघातात बाबा रामदेव यांचे निधन झाले असा हा मेसेज होता आणि अपघाताचे फोटोही या मेसेजमध्ये होते. त्यामुळे या बातमीची खात्री करण्यासाठी लोकांची फोनाफोनी सुरू झाली. मात्र हा कुणाचातरी खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले आणि या गोंधळाला पूर्णविराम मिळाला.
बाबा रामदेव यांचा जो फोटो मेसेजमध्ये होता तो खराच होता मात्र हा फोटो २०११ मधील होता. बाबा रामदेव यांनी तेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध उपोषण केलं होतं आणि उपोषणाच्या सातव्या दिवशी त्यांची तब्येत बिघडली होती. तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेत असतानाचा फोटो आज सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आला. या मेसेजमध्ये जी कार आहे त्या कारला बिहारमधील बक्सर येथे अपघात झाला होता. मात्र आज व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये हा अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झाल्याचे भासवण्यात आले.
सोशल मीडियात हा मेसेज व्हायरल होताच या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी पतंजली योगपीठात शेकडो फोन खणखणले. या सर्वांना उत्तर देताना तेथील कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. त्यानंतर हरिद्वार येथून पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी याबाबत निवेदन जारी केलं व हा कुणाचातरी खोडसाळपणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाबा रामदेव यांची प्रकृती उत्तम आहे. कोणत्याही काळजीचे कारण नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button