ताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरेंचा इशारा, तूर खरेदी केंद्र 24 तासात सुरु करा, अन्यथा…

मुंबई : येत्या 24 तासात राज्यातील सर्व तूर खरेदी केंद्र सुरु करावीत. अन्यथा राज्यभर आंदोलनं करावी लागतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे.

मनसेचा इशारा

“सरकारनं ही सर्व तूर खरेदी केंद्रं येत्या 24 तासात सुरू करावीत आणि शेतकरी घेऊन आलेली सर्व तूर ताबडतोब सरकारने अगोदर जाहीर केलेल्या हमीभावाने खरेदी करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपूर्ण राज्यभर आंदोलन करावं लागेल.”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

“महाराष्ट्र सरकारने यंदा संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्र सुरू केली. परंतु पहिल्यापासूनच त्यात अनेक गोंधळ घातले गेले. कधी म्हणाले गोदामात जागा शिल्लक नाही, कधी बारदाना उपलब्ध नाही म्हणाले तर कधी वजनकाटे नसल्याचं कारण सांगितलं गेलं आणि बरीच खरेदी केंद्रं सतत बंदच ठेवण्यात आली. शेतकरी तूर घेऊन आले पण त्यांना ताटकळत ठेवण्यात आलं. ह्यातून सरकारचा उद्देश स्पष्ट समोर आला आहे.”, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

“सरकार फसवणूक करत आहे आणि लाखो क्विंटल तूर प्रत्येक खरेदी केंद्रावर शिल्लक असतानाही ही खरेदी केंद्र बंद केली जात आहेत. आज हा शेतकरी सरकारच्या भरवशावर घरदार सोडून तिथे आला आहे आणि त्याला फसवलं जात आहे.”, असा आरोपही राज ठाकरेंनी सरकारवर केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button