breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापुरात विजेच्या कडकडासह पाऊस झाला, तर तिकडे सिंधुदुर्गतील कुडाळ तालुक्‍याला पावसाने चांगलेच झोडपले.
पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ-झारापदरम्यानची वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. काही ठिकाणी टेलिफोन सेवा ठप्प झाली. सिंधुदुर्गातील नांदगाव, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, वेगुर्ले, मालवण तालुक्‍यात अवकाळी पाऊस झाला. वाशिम शहरात पावसाने हजेरी लावली. सकाळी शहराचा पारा 41 अंशांवर पोहचला होता. उन्हाच्या कडाक्‍याने लोक हैराण झाले होते. अचनाक दुपारी आकाशात ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. फक्त 10 ते 15 मिनिटे बरसलेल्या पावसाने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि वाशिमकरांची उन्हाच्या कडाक्‍यापासून सुटका झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button