breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
बारावीच्या परिक्षेत मुलींचीच बाजी ; राज्याचा 88.41 टक्के निकाल

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (बुधवार) जाहीर करण्यात आला असून, निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्याचा एकूण निकाल 88.41 टक्के लागला आहे.
राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मारली बाजी मारल्याचे चित्र आहे. सर्व विभागातून 92.36 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, 85.23 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात एक टक्के घट झाली आहे. राज्यात यंदा 14 लाख 16 हजार 986 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी 12 लाख 52 हजार 817 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक 94.85 टक्के निकाल लागला आहे. तर, नाशिक विभागाचा सर्वांत कमी म्हणजे 86.13 टक्के निकाल लागला आहे. पुणे विभाग तिसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान, निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. – गुणपडताळणीसाठी 31 मे ते 9 जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी 31 मे ते 11 जूनपर्यंत अर्ज करता येईल. तसेच उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करावा. असेही आवाहन केले आहे. विभागनिहाय निकाल – कोकण विभाग – 94.85 टक्के, कोल्हापूर – 91 टक्के, पुणे – 89.58 टक्के, औरंगाबाद – 88.74, लातूर – 88.31, अमरावती – 88.08, मुंबई – 87.44, नागपूर – 87.57, नाशिक – 86.13 तर शाखानिहाय निकाल – विज्ञान शाखा – 95.85 टक्के, – कला शाखा – 78.93 टक्के, – वाणिज्य शाखा – 89.50 टक्के, – व्यवसाय अभ्यासक्रम 88.18 टक्के लागला आहे.

असा पाहा निकाल –
– mahresult.nic.in वर गेल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल किंवा महाराष्ट्र एचएससी निकाल 2018
– त्यानंतर परीक्षा बैठक क्रमांक (सीट नंबर) आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
– ही सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्यानंतर निकालाची प्रिंटही काढता येऊ शकते.