breaking-newsपुणे
राज्यातील 48 तहसिलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढती

पुणे – शासनाने राज्यातील 48 तहसिलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढती दिली आहे. या अधिकाऱ्यांना लवकरच नविन नियुक्तीचे ठिकाण दिले जाणार आहे.
सुरेखा माने, नागेश पाटील, देवदत्त ठोंबरे, मोहिनी चव्हाण, प्रकाश राऊत, रमेश पवार, अनुप खांडे, दिपक शिंदे , राजेश्वर हांडे आदींसह 48 तहसिलदारांना उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली आहे. यासाठीचे आदेश शासनाने जारी केले आहेत. पदोन्नतीनंतर संबंधित अधिकारी पदावर रुजू न झाल्यास त्यांना पदोन्नतीबाबत स्वारस्य नसल्याचे समजून सामान्य प्रशासन विभागाच्या स्थायी आदेशानुसार त्यांचे नाव निवडसूचीतून वगळण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. तसेस संबधित अधिकाऱ्यांनी पदोन्नती नाकारल्यास नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.