महाराष्ट्र

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादेत मारहाण

औरंगाबाद: राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादेत मारहाण करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये दुपारच्या दरम्यान मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीत गायकवाडांच्या छातीला दुखापत झाल्याची माहिती आहे. मुंबईतील दादर स्टेशनच्या बाजुला असलेल्या ‘आंबेडकर भवन’ पाडल्याच्या रागातून रत्नाकर गायकवाड यांना मारहाण करण्यात आली आहे. आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेर्धात घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केली. रत्नाकर गायकवाड यांच्याबरोबरच त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीलाही भारिप कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी भारिपचे नगरसेवक अमित भुईगळ यांच्यास दोन महिला आणि चार पुरुष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button