breaking-newsराष्ट्रिय

राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सायना, विराट, ऋतिकला दिले आव्हान

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी अनोख्या पद्धतीने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. राठोड यांनी व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन अभिनेता ऋतिक रोशन, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवालला आव्हान देत, या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राज्यवर्धन राठोड यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऊर्जेतून प्रेरणा मिळाल्याचे मागील वर्षी क्रीडा मंत्री बनलेल्या राज्यवर्धन राठोड यांनी व्हिडीओत म्हटले आहे. पंतप्रधान रात्रंदिवस काम करतात आणि संपूर्ण देश फिट व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. आपल्या कामात व्यायामाचा समावेश करण्याबाबत सांगतात, असे राठोड म्हणाले. यासाठी राज्यवर्धन राठोड यांनी नागरिकांना व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितले आहे.

राठोड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते स्वत:च्या कार्यालयातच पुश अप्स करताना दिसत आहेत. राठोड यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना फिटनेसबाबत जागरुक करताना ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा नाराही दिला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी या मोहीमेत ऋतिक, सायना आणि कोहलीला नॉमिनेट केले आहे. नेटीझन्स राज्यवर्धन राठोड यांच्या मोहीमेचे कौतुक तर करत आहेतच, तर त्याला उत्तर म्हणून व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओही पाठवत आहेत.

Rajyavardhan Rathore

@Ra_THORe

🇮🇳🏆

Post pictures and videos of how you keep yourself fit and send a to your friends on social media. Here’s my video 😀and I challenge @iHrithik, @imVkohli & @NSaina to join in🥊

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button