breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राईनपाडा येथील घटनेच्या निषेधार्त पिंपरीत राष्ट्रवादीचा एल्गार

पिंपरी – किडण्या काढणारी व मुले पळविणारी टोळी गावात आल्याच्या अफवेवरून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या राईनपाडा, पिंपळनेर येथे दादाराव शंकर भोसले, भारत शंकर भोसले, राजू भोसले, भारत माळवे, आगणू भोसले या निरपराध पाच जणांचा हकनाक बळी गेला. या घटनेच्या निषेधार्त पिंपरी-चिंचवड शहर‍ (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे व शहराध्यक्ष्‍ा संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी (दि. 24) दुपारी दोन वाजता सरकारचा निषेध करूण आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, सदरील प्रकरणाचा खटला फॉस्ट ट्रक कोर्टात चालवावा. ह्या खटल्यामध्ये अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक व्हावी. पीडित कुटुंबियांना पंचविस लाख रुपयांची भरपाई व कुटुंबातील व्यक्तीस सरकारी नोकरी द्यावी, तसेच आरोपींना फाशी द्यावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम स्वरूपी गोरगरिबांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिला आहे, यापुढे ही अशा घटना घडल्यास आम्ही तिव्र स्वरूपाचे आंदोलन करू. आंदोलनात नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

यावेळी नगरसेविका अनुराधा गोफणे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, ‍विजय लोखंडे, अॅड. सचिन औटे, सुमित लगस, निलेश पांढारकर, विशाल काळभोर, शकुंतला भाट, दीपक साकोरे, मिनाक्षी उंबरकर, देवीदास गोफणे, गोरख लगस, निलेश इंगवले, मयुर माळवे, रवि चव्हाण, सुरेश भोसले, हर्षवर्धन भोईर, सतिष भोसले, विनय काळभोर, हमीद शेख, तानुबाई लगस, अनिता भोसले, निता लगस, सविता लगस, सुवर्णा लगस इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थ‍ितीत होते.
——————

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button