breaking-newsआंतरराष्टीय

रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन यांचा चौथ्यांदा शपथविधी

मॉस्को (रशिया) : रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतिन यांचा चौथ्यांदा शपथविधी झाला असून त्यांची दोन दशकांची सत्ता आणखी सहा वर्षे राहणार आहे. पाश्चिमात्य देशांशी संबंध तणावाचे बनलेले असताना ते पुन्हा अध्यक्ष झाले आहेत.

दरम्यान, १९९९ पासून पुतिन सत्तेवर असून ते जोसेफ स्टालिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले नेते ठरले आहेत. मार्चमधील निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पुतिन यांनी एकूण ७७ टक्के मते जिंकली होती, पण या निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर बंदी घातली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेचे पुनरूज्जीवन करण्याचे आश्वासन देऊन ते सत्तेवर आले.

‘रशियाच्या वर्तमान व भविष्यासाठी सर्व काही करण्याकरिताच माझे आयुष्य आहे व ते मी माझे कर्तव्य समजतो’ असे पुतिन यांनी सांगितले. रशियन लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानून त्यांनी सांगितले, की माझ्यावरच्या मोठय़ा जबाबदारीची मला जाणीव आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button