breaking-newsमनोरंजन

रणबीर कपूरनं केली टॅक्स चोरी, ‘कॅग’चा खुलासा

नवी दिल्ली : संसदेत शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या ‘कॅग’च्या (CAG)अहवालात बॉलिवूडच्या अनेक बड्या हस्तींनी टॅक्स चोरी केल्याचं म्हटलंय. कॅगच्या या अहवालात रणबीर कपूर याच्यासहीत सोहेल खान प्रोडक्शन, सलमान खान व्हेंचर्स, अरबाज खान प्रोडक्शन, शाहरुख खानची रेड चिलीज एन्टरटेन्मेंट, करण जोरची धर्मा प्रोडक्शन यांनीही टॅक्स चोरी केल्याचं म्हटलं गेलंय.

टॅक्स चोरीची मोडस ऑपरेंडी…

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरला ‘ए दिल है मुश्किल’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ब्रिटनमध्ये झालेल्या शुटिंगसाठी लंडनची कंपनी ADHM FILMS UK नावाच्या एका परदेशी कंपनीकडून ६.७५ करोड रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. हा पैसा ‘सेवा निर्यात’ केल्याचं सांगत तब्बल ८३.४३ लाख रुपयांचा सर्व्हिस टॅक्स रणबीर कपूरनं वाचवलाय.

अहवालात म्हटल्याप्रमाणे असे दोन प्रकरणं आहेत ज्यामध्ये, सिनेमांचं शुटिंग भारत आणि परदेशात झालंय. परदेशात झालले्या शुटिंगमध्ये कलाकारांना मानधन परदेशी कंपन्यांकडून दिलं गेलंय. या प्रकरणांत सेवा निर्यात करण्यात आल्यात आणि त्यामुळे त्यामुळे टॅक्स देणं लागत नसल्याचं दाखवण्यात आलंय.

टॅक्स वाचवण्यासाठी रणबीर कपूरनं चुकीची पद्धत वापरल्याचा या अहवालात उल्लेख करण्यात आलाय. कॅगचा हा अहवाल २०१३-१४ ते २०१५-१६ दरम्यानचा आहे. सर्व्हिस टॅक्सचा डाटा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीच्या आकड्यांसोबत जुळवून पाहिल्यानंतर ही गडबड समोर आल्याचं म्हटलं गेलंय.

चौकशी होणार

धर्मा प्रोडक्शन, एडीएचएम फिल्म्स आणि रणबीर कपूर यांच्यादरम्यान झालेल्या देवाण-घेवाणीची चौकशी करून या प्रकरणात योग्य पद्धतीनं टॅक्स लावण्यात आलाय की नाही? याची चौकशी होईल, असंही अहवालात म्हटलं गेलंय.

कॅगच्या म्हणण्यानुसार, वितरकांनी २०१२-१३ ते २०१४-१५ दरम्यान ५०.५६ करोड रुपयांचा वितरण कमाई गोळा केली. परंतु, त्यांनी यावरही ६.२१ करोड रुपयांचा सेवा कर भरलेला नाही… आणि ही कमाई थिएटर कामकाजाच्या अधिकाराच्या रुपात दाखवली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button