breaking-newsमनोरंजन
रणबीरच्या बहिणीने आलियाला दिलं खास गिफ्ट

बॉलिवूडमध्ये सध्या कोणत्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होत असेल, तर ती गोष्ट म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचं रिलेशनशिप. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून आलिया आणि रणबीर स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीपूर्वी ऑफस्क्रीन केमिस्ट्रीच जास्त चर्चेत आली आहे.
रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत असून, त्यांच्या रिलेशनशिपविषयी आता कुटुंबियांनाही माहिती झाली आहे, असं चित्र आहे. सुरुवातीला ऋषी कपूर यांचं ट्विट, त्यामागोमाग नीतू कपूर यांनी आलियाच्या फोटोवर केलेल्या कमेंट आणि आता रणबीरच्या बहिणीने म्हणजेच रिद्धीमाने तिच्यासाठी भेट स्वरुपात दिलेलं एक खास ब्रेसलेट या सर्व गोष्टी बरंच काही सांगून जात आहेत.