breaking-newsराष्ट्रिय

रडत खडत जगण्यात काय अर्थ आहे, घटस्फोट अर्जावर तेज प्रताप यादवची प्रतिक्रिया

लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यात तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी पाटणा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तेज प्रताप राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आहेत. यावर्षी १२ मे २०१८ रोजी तेज प्रताप यादव यांचे ऐश्वर्या रायबरोबर लग्न झाले होते. यासंबंधी बोलताना तेज प्रताप यादव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘हो मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. रडत खडत जगण्यात काय अर्थ आहे’, अशी बोलकी प्रतिक्रिया तेज प्रताप यादव यांनी दिली आहे. पाटणा येथील मोठया मैदानात तेज प्रताप-ऐश्वर्याचा हायप्रोफाईल विवाहसोहळा मे महिन्यात पार पडला होता. जवळपास १० हजार लोक या लग्नाला आले होते.

ANI

@ANI

It is true that I have filed a petition. Ghut-ghut ke jeene se toh koi fayeda hai nahi: Tej Pratap Yadav, on filing for divorce from Aishwarya Rai

ऐश्वर्या राय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना अचानक हे घटस्फोटाचे वृत्त आले आहे. ऐश्वर्या सुद्धा राजकीय कुटुंबातून असून २०१९ लोकसभा निवडणुकीत ऐश्वर्याला सारण लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिले जाईल अशी चर्चा होती. ऐश्वर्या राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आणि बिहारचे माजी वाहतूक मंत्री चंद्रिका राय यांची मोठी मुलगी आहे. चंद्रिका राय हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांचे सुपूत्र आहेत. दरोगा बिहारचे १० वे मुख्यमंत्री होते. १६ फेब्रुवारी १९७० ते २२ डिसेंबर १९७० पर्यंत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button