breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या संघटनेत फूट

बंडखोर नेत्याकडूून समान नावाच्या संघटनेची स्थापना 
लखनौ – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2002 मध्ये स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनी संघटनेत फूट पडली आहे. संघटनेचे बंडखोर नेते सुनील सिंह यांनी समान नावाची संघटना स्थापन केली आहे. हिंदूू युवा वाहिनी (भारत) असे नाव नव्या संघटनेला देण्यात आले आहे.

हिंदू युवा वाहिनीच्या ज्येष्ठ नेत्यांशी अलीकडेच माझी बैठक झाली. त्या बैठकीत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी एकमताने निवड करण्यात आली, असा दावा सिंह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. मी माझे गुरू आदित्यनाथ यांचाच अजेंडा पुढे नेणार आहे. आमची संघटनाच मूळ हिंदूू युवा वाहिनी आहे. आम्ही हिंदूंसाठी लढलो आणि यापुढेही लढत राहू. देशभरात आम्ही हिंदुत्व आंदोलनाची व्याप्ती वाढवू. आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवा अशी मागणी सर्वप्रथम मीच केली होती.

मात्र, भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले होते, असा दावाही सिंह यांनी केला. दरम्यान, हिंदू युवा वाहिनीने सिंह यांच्या संघटनेशी कुठलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे. बेशिस्तीबद्दल सिंह यांना जानेवारी 2017 मध्ये आदित्यनाथ यांनी संघटनेतून काढून टाकले, असेही वाहिनीकडून स्पष्ट करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button