breaking-newsपुणे
येरवड्यात मोकळ्या मैदानातील कचरा पेटला

येरवडा – येथील डॉ. आंबेडकर चौकाजवळ असणाऱ्या मोकळ्या मैदानात साचून राहिलेल्या कचरा पेटला. स्थानिक नागरिकांनी फेकलेला कचरा साठून राहून जमा झालेला ढीग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे तत्काळ नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी अग्निशामक दलाचे महेश मुळीक, काणू पोटे, रोहिदास टिंगरे, ड्रायव्हर रावतू भोईरे उपस्थित होते. येथील परिसरात मोठी दाट लोकवस्ती असल्याने कचऱ्याची समस्या नेहमी भेडसावत असते. परिसरात कचरा व्यवस्थपनाची गंभीर असल्याने, नागरिक जवळच मोकळ्या परिसरात कचरा फेकतात. त्यामुळे भविष्यात मोठ्या आगीची घटना घडू शकते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.