महाराष्ट्रमुंबई
येत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील सर्व ग्रामपंचायती येत्या दोन वर्षांत फायबर ऑप्टिकलने जोडण्याचा प्रकल्प आहे, या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतींचे सर्व कामे ऑनलाईन होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील माहिती तंत्रज्ञान धोरण लोकाभिमुख आहेत. आधुनिक सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच धर्तीवर येत्या दोन वर्षांत राज्यातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला व्हावा यासाठी आरोग्य क्षेत्रातही त्याचा वापर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.