breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

येडियुरप्पा यांचा कमबॅक करण्याचा निर्धार

बंगळूर – नंबरगेममध्ये पीछेहाट झाल्याने तीन दिवसांपेक्षा कमी कालावधीत कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून जावे लागण्याची नामुष्की भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर ओढवली. मात्र, राजकीय धक्‍क्‍यातून स्वत:ला सावरत येडियुरप्पा यांनी कमबॅक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

फेसबुक पोस्टद्वारे येडियुरप्पा यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. तुमचे प्रयत्न व्यर्थ ठरणार नाहीत. तूर्त शांत आणि स्वस्थ रहा. मी लवकरच अधिक ताकदीनिशी आणि अधिक क्षमतांनिशी परतेन. तुमची ताकद हीच माझी शक्ती आहे. माझे मनोधैर्य शाबूत आहे.

भाजपच्या पदरात सर्वांधिक जागा टाकत कर्नाटकच्या मतदारांनी सरकार स्थापन करण्यासाठीची जबाबदारी टाकली. मात्र, आम्हाला त्याकामी अपयश का आले हे आता सर्व जगाला ज्ञात झाले आहे. जनतेने नाकारलेल्या दोन पक्षांनी आमच्या विरोधात कारस्थान केले, अशा शब्दांत येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेसाठी एकत्र आलेल्या कॉंग्रेस आणि जेडीएसला टीकेचे लक्ष्य केले. विरोधी बाकांवर बसून आम्ही (भाजप) शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button