breaking-newsराष्ट्रिय

‘येडं पेरलं आणि खुळं उगवलं’, धनंजय मुंडेंचा रावसाहेब दानवेंना टोला

विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं असा टोला मारत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना विंग कमांडर अभिनंदन यांचा ‘हेलिकॉप्टरचा पायलट’ असा उल्लेख केला होता. अभिनंदन हे भारताच्या लढाऊ विमानांचे वैमानिक आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. यावरुनच धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे की, ‘यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष’. यावेळी धनंजय मुंडे यांनी बे एके बे…बे दुने चार…बे त्रिक बेअक्कल अशा शब्दांत टीका करत येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी टीका केली आहे.

Dhananjay Munde

@dhananjay_munde

बे एके बे
बे दुने चार
बे त्रिक बेअक्कल

यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष…

‘येडं पेरलं आणि खुळं उगवलं’ अशी गत आहे सगळी.https://bit.ly/2uQAuTX 

58 people are talking about this

काय बोलले होते रावसाहेब दानवे ?
तुम्ही चॅनेलवर पाहिलं असेल 24 तासाच्या आत पाकिस्तानी सैन्याने अभिनंदनला आपल्या देशात आणून सोडला. अरे एक पोलीसवाला आमची मोटारसायकल पकडतो, ट्रिपल सीट धरलं तर चार दिवस कोर्टातून सोडून आणावी लागते. आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट 24 तासांत सोडून आणला असा पंतप्रधान या देशाला पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button